भारतात लाँच झालाय Infinix Note 30 5G स्मार्टफोन, दिलीये एवढी फास्ट चार्जिंग की  भसाभस होईल चार्ज

Infinix ने भारतात आपला नवीन फोन Infinix Note 30 5G लाँच केला आहे.

हा फोन 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला असून या फोनची किंमत 14 हजार 999 रुपये आहे.

Infinix Note 30 5G ला Android 13 वर आधारित XOS 13 मिळेल. याशिवाय या फोनमध्ये 6.78 इंचाचा HD Plus IPS डिस्प्ले आहे.

हा फोन ग्राफिक्ससाठी G57 MC2 GPU सह MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर, 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेजने सुसज्ज आहे.

Infinix Note 30 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत. ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 108 मेगापिक्सलची आहे. फ्रंटसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Note 30 5G मध्ये 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth, GPS, NFC, 3.5mm ऑडिओ जॅक, टाइप-सी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

यात 45W चे फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. यामुळे फोन भसाभस चार्ज होण्यास मदतच होणार आहे.