जाणून घेऊया बेलपत्राशिवाय कोणती पत्री महादेवाला वाहतात 

श्रावण महिन्यात बेलपत्राने महादेवाची पूजा केली जाते. 

महादेवाची पूजा शमीपत्रानेही केली जाते. 

 शंकराची पूजा भांगेची पानं अर्पण करूनही केली जाऊ शकते.

महादेवाला पिंपळाचे पान वाहिल्यास संकटं दूर होतात असं म्हटलं जातं.

जर तुम्हाला बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही धतुराचे फळही वाहू शकता. 

महादेवाच्या पिंडीवर दूर्वा वाहिल्याने आयुर्मान वाढते असं म्हणतात. 

अरहरची पानं महादेवाच्या पिंडीला वाहिल्यास सुख-समृद्धी मिळते असं मानलं जातं.