iphone15 घेण्यासाठी लोकांच्या रांगा, काय आहेत फिचर्स ?
iPhone 15 ची विक्री भारतात सुरु झाली आहे. लोक अनेक तास रांगेत उभं राहून हा फोन खरेदी करतायत.
iPhone 15 मध्ये काय खास फिचर्स आहेत जाणून घेऊयात.
आयफोन 15 च्या 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 79,900 रुपये आहे. तथापि, पहिल्या दिवशी खरेदी केल्यास 14 हजारांची सूट मिळू शकते. काही बँकांच्या कार्डवरही ऑफर्स आहेत.
आयफोन 15 प्लसच्या 256 आणि 512 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 89,900 आणि 1,09,900 रुपये इतकी आहे.
आयफोन 15 सिरीजमध्ये आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे.
iPhone 15 मध्ये बायोनिक A16 चिपसेट आहे.
आयफोनमध्ये 48MP कॅमेरा आहे.48 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याला 12 मेगापिक्सेलच्या दुसऱ्या सेन्सरचा सपोर्ट देण्यात आला आहे.
आयफोन प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण देण्यात आले आहे.