iPhone 18 Pro Series Launch! पाहा काय मिळालं नवीन

Science Technology

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

iPhone 18 Pro Series लॉन्च! कॅमेरा, AI आणि बॅटरीमध्ये मोठा बदल

Apple ने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सादर केले आहेत. नवीन A20 Pro चिप, 48MP कॅमेरा आणि दमदार बॅटरी हे मोठे हायलाइट्स आहेत.

Picture Credit: apple

iPhone 18 Pro आणि Pro Max

नवीन Pro लाइनअपमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन मॉडेल्स आहेत. दोन्ही फोन Black, Silver, Glacier आणि नवीन Burgundy रंगात उपलब्ध असतील.

Picture Credit: apple

कॅमेऱ्यात पहिल्यांदाच Variable Aperture

iPhone 18 Pro मध्ये 48MP Fusion Main Camera देण्यात आला आहे. यात पहिल्यांदाच Variable Aperture मिळते, त्यामुळे प्रकाश आणि Depth of Field वर अधिक नियंत्रण मिळणार आहे.

Picture Credit: apple

प्रो कॅमेरा कंट्रोल्स

नवीन Pro Controls मधून Aperture, Shutter Speed आणि White Balance सारख्या सेटिंग्स मॅन्युअली बदलता येतील. Histogram सारखे पर्यायही देण्यात आले आहेत.

Picture Credit: apple

फोटोची Authenticityही तपासता येणार

Apple ने Reference Image फीचर आणले आहे. यामुळे फोटो काढताना सेन्सरने टिपलेली माहिती वापरून मूळ फोटो आणि एडिट केलेला फोटो यांची तुलना करता येईल.

Picture Credit: apple

A20 Pro चिपची ताकद

iPhone 18 Pro सीरिजमध्ये नवीन A20 Pro चिप आहे. 2nm टेक्नॉलॉजीवर आधारित या चिपमध्ये 6-core CPU, 7-core GPU आणि नवीन Neural Engine देण्यात आला आहे.

Picture Credit: apple

Battery Life मध्ये मोठी वाढ

eSIM-only मॉडेलमध्ये iPhone 18 Pro 36 तासांपर्यंत, तर iPhone 18 Pro Max 45 तासांपर्यंत Video Playback देऊ शकतो. Pro Max वर फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमधून सुमारे 7 तासांचा Video Playback मिळू शकतो.

Picture Credit: apple

iOS 27 आणि नवीन Siri AI

iPhone 18 Pro सीरिजमध्ये iOS 27 मिळेल. नवीन Siri AI वैयक्तिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करेल. स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीवरूनही Siri मदत करू शकणार आहे.

Picture Credit: apple

किंमत आणि भारतात कधी?

iPhone 18 Pro ची किंमत $1,199, तर Pro Maxची $1,299 पासून. भारतात 12 सप्टेंबरपासून Pre-order आणि 18 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.

Picture Credit: apple