आयपीएलमध्ये शुभमनने त्याच्या फलंदाजीने साऱ्यांनाच वेड लावलं आहे.

गिलने 16 सामन्यांत 156.43 च्या स्ट्राइक रेटने आणि 60.79 च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत.

शुभमन गिलने 3 शतके, 4 अर्धशतकं, 78 चौकार आणि 33 षटकार मारले आहेत. 

गिलची फलंदाजी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही इम्प्रेस झाला आहे. सचिनने ट्विटमध्ये गिलचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "शुभमन गिलची या मोसमातील कामगिरी अविस्मरणीय आहे, त्याने शतके झळकावून आपली छाप सोडली आहे."

 "एका शतकाने मुंबई इंडियन्सच्या आशा जिवंत ठेवल्या, तर दुसऱ्या शतकाने मुंबईच्या आशा संपुष्टात आणल्या"

" शुभमनच्या फलंदाजीची  सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव, शांतता आणि धावांची भूक.."

 त्याचवेळी सचिनने आपल्या ट्विटमध्ये एमएस धोनी, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचेही कौतुक केले.

IPL 2023 च्या क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आज (29 मे) रोजी राखीव दिवशी गुजरात आणि चेन्नईची फायनल होणार आहे, काल पावसामुळे सामना होऊ शकला नाही.