आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला.

धोनीनंतर (पाचवी विकेट) रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी CSK चा डाव सावरला. 

जडेजाने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटलं. 

डग आऊटमध्ये बसलेल्या धोनीने शेवटच्या क्षणी आपले डोळ बंद केले होते.

CSK च्या विजयानंतर जडेजाने आनंदाने उडी मारली आणि धोनीने त्याला उचलून घेतले.

चेन्नईच्या विजयानंतर धोनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

 जडेजाची पत्नी रिवाबानेही जडेजाला मिठी मारली. 

तर दुसरीकडे निराश झालेल्या मोहितला कॅप्टन हार्दिक पांड्या सावरताना दिसला.

चेन्नईने 5 विकेट्सने (डीएलएस मेथड) हा सामना जिंकला.