चेन्नई सुपर किंग्सने MS धोनीच्या नेतृत्वाखाली IPL 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा एक माइलस्टोन गाठणाऱ्या धोनीवर आहेत.
धोनीचा हा 250 वा आयपीएल सामना असणार आहे. 250 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे.
धोनीनंतर रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल सामने खेळले आहेत. रोहितने 243 सामने खेळले आहेत.
यानंतर 242 आयपीएल सामने खेळलेल्या दिनेश कार्तिकचा क्रमांक लागतो.
IPL 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
एमएस धोनीचा प्रयत्न आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचा असेल.