आमिर खानच्या मुलीचं महाराष्ट्रीयन केळवण

Photo Credit : khan.ira/Instagram

अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

नुकतंच आयरा आणि नुपूरचं केळवण पार पडलं आहे.

केळवणाचे फोटो आणि व्हिडिओ आयराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नुकत्याच झालेल्या केळवणासाठी आयराने चक्क नऊवारी साडी नेसल्याचं दिसतंय.

तिने केळवणासाठी काही वेळ पिंक सहावारी साडीही नेसल्याचं दिसतंय.

नाकात नथ आणि साडी असा तिचा लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

"मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही", असा उखाणाही आयराने नुपूरसाठी घेतला आणि त्याला घास भरवला.

आयरानं शेअर केलेल्या केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोमध्ये अभिनेत्री मिथिला पालकरदेखील दिसत आहे. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.