Published Jan 07, 2025
By Sayali Sasane
Pic Credit- Instagram
दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचा आज ५७ वा वाढदिवस आहे. हा अभिनेता आता आपल्यात नसला तरी त्याचे चित्रपट चाहत्यांच्या मनात अजूनही घर करून आहेत.
अभिनेत्याच्या खास पाच चित्रपटांवर आपण नजर टाकणार आहोत. जे पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.
'पान सिंग तोमर' हा चित्रपट २०१२ प्रदर्शित झाला होता जो एका जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याला पुरस्कार देखील मिळाला आहे.
रोमँटिक आणि कॉमेडीवर आधारित 'द लंचबॉक्स' चित्रपट पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
पिकू हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. हा एक कॉमेडी चित्रपट आहे जो तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
प्रेक्षकांनी इरफान खानच्या 'हिंदी मिडीयम' चित्रपटाला खूप प्रेम दिले. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
इरफान खानची २०१७ मध्ये रिलीज झालेली 'करीब करीब सिंगल' हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
.