कार खरेदीचा ट्रेंड बदलला! पेट्रोलपेक्षा CNG-Hybrid-EV ठरले नंबर-1

Automobile

9 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑगस्ट 2026 मध्ये CNG, Hybrid आणि EV कारच्या एकत्रित विक्रीने पहिल्यांदाच पेट्रोल कारला मागे टाकले.

भारतीय कार मार्केटमध्ये मोठा उलटफेर!

Picture Credit:pinterest

ऑगस्टमध्ये पेट्रोल/एथेनॉल कारचा हिस्सा 40.85% राहिला, तर CNG, Hybrid आणि EV मिळून 41.95% वर पोहोचले.

पेट्रोलची आघाडी संपली?

Picture Credit:pinterest

Alternative fuel मध्ये CNG/LPGचा हिस्सा 25.28% होता. कमी running cost मुळे ग्राहकांचा CNG कारकडे कल कायम असल्याचे दिसते.

CNG ठरली गेमचेंजर

Picture Credit:pinterest

Hybrid कारचा हिस्सा एका वर्षात 7.96% वरून 9.04% झाला. म्हणजे पेट्रोलची सोय आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा फायदा देणाऱ्या कारकडेही ग्राहक वळत आहेत.

Hybridचीही जबरदस्त वाढ

Picture Credit:pinterest

EV कारचा हिस्सा 5.83% वरून 7.63% झाला. वाढती मॉडेल्स, चार्जिंग सुविधा आणि पेट्रोलवरील खर्चामुळे EVचा पर्याय अधिक चर्चेत आला आहे.

EVची मागणी वाढतेय

Picture Credit:pinterest

E20 पेट्रोलबाबत काही ग्राहकांमध्ये mileage आणि जुन्या वाहनांच्या compatibility विषयी चिंता आहे. या पार्श्वभूमीवर CNG, Hybrid आणि EVकडे आकर्षण वाढल्याचे FADAकडून नमूद करण्यात आले आहे

E20चा किती परिणाम?

Picture Credit:pinterest

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल कार अजूनही सर्वात मोठा एकल fuel category आहे. मात्र CNG + Hybrid + EV एकत्र केल्यावर त्यांचा हिस्सा पेट्रोलपेक्षा पुढे गेला आहे.

पेट्रोल अजूनही संपलेले नाही!

Picture Credit:pinterest

खर्चाचा विचार, fuel efficiency, E20बाबतची चर्चा आणि पर्यायी वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे भारतीय ग्राहकांकडून fuel choice मध्ये बदल दिसत आहे.

ग्राहकांचा मूड बदलतोय?

Picture Credit:pinterest

ऑगस्टमध्ये भारतात 4,02,398 passenger vehicles विकल्या गेल्या. वर्षभराच्या तुलनेत ही वाढ 16.14% होती.

ऑगस्टमध्ये कार विक्रीही विक्रमी

Picture Credit:pinterest

सणासुदीचा हंगाम सुरू होत असताना CNG, Hybrid आणि EVची ही आघाडी कायम राहते का, याकडे ऑटो इंडस्ट्रीचे लक्ष असेल. भारतीय कार बाजाराचा fuel game मात्र बदलताना दिसतोय!

आता पुढे काय?

Picture Credit:pinterest