तुमच्या Solar Panel ची कार्यक्षमता कशी तपासतात? पाहा ही खास उपकरणं

Science Technology

10 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Solar Irradiance Meter सूर्यप्रकाशाची तीव्रता मोजतो. पॅनेलला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतोय का, हे तपासण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो.

Solar Irradiance Meter

Picture Credit: pinterest

Digital Multimeter च्या मदतीने सोलर पॅनेलचा व्होल्टेज आणि योग्य पद्धतीने करंट मोजता येतो. कनेक्शन किंवा वायरिंगमधील संभाव्य समस्या शोधण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.

Digital Multimeter

Picture Credit: pinterest

I-V Curve Tracer पॅनेलचा करंट आणि व्होल्टेज यांचं मोजमाप करतो. त्यातून पॅनेल किती पॉवर तयार करू शकतं आणि त्याची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे का, हे समजण्यास मदत होते.

I-V Curve Tracer

Picture Credit: pinterest

Thermal Imaging Camera पॅनेलवरील तापमानातील फरक दाखवतो. एखादा भाग असामान्यपणे गरम होत असल्यास Hotspot किंवा संभाव्य बिघाड शोधण्यासाठी हे उपकरण उपयोगी ठरतं.

Thermal Imaging Camera

Picture Credit: pinterest

हे उपकरण सोलर सिस्टिमच्या इन्सुलेशनची स्थिती तपासतं. इन्सुलेशन कमकुवत झालं आहे का, हे शोधण्यासाठी तंत्रज्ञ याचा वापर करतात.

Insulation Resistance Tester

Picture Credit: pinterest

DC Clamp Meter च्या मदतीने योग्य वायरभोवती क्लॅम्प लावून करंट मोजता येतो. सोलर पॅनेलच्या स्ट्रिंगमधून किती करंट वाहतो, हे तपासण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

DC Clamp Meter

Picture Credit: pinterest

पॅनेलवर धूळ साचणं, सावली पडणं, जास्त तापमान, वायरिंगमधील समस्या किंवा इन्व्हर्टरचा बिघाड यामुळे वीज निर्मिती कमी होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण सिस्टिम तपासणं महत्त्वाचं आहे.

वीज कमी तयार होण्यामागे काय कारण?

Picture Credit: pinterest

सोलर पॅनेलची नियमित स्वच्छता, वीज निर्मितीची नोंद आणि तज्ज्ञांकडून तपासणी केल्यास संभाव्य समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. विद्युत चाचण्या प्रशिक्षित तंत्रज्ञाकडूनच करून घ्या.

योग्य तपासणी का महत्त्वाची?

Picture Credit: pinterest