अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘बवाल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
जान्हवी आणि शेखर आधी रिलेशनशिपमध्ये होते पण मध्यंतरी त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या.
मात्र पुन्हा ते एकत्र दिसल्याने ते रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातंय.
शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.
जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरच्या घरी ते एकत्र कारने जाताना दिसले.