जर तुम्ही इंस्टाग्राम यूजर असाल तर जन्नत जुबैर रहमानी हे नाव तुम्हाला नक्की माहिती असेल.
जन्नत जुबैर रहमानीचे इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.
भारतातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेल्या व्यक्तींपैकी ती एक आहे
याच फॅन फॉलोइंगवर ती कोट्यवधी रुपयांची कमाई करते.
सध्याच्या युगात सोशल मीडिया हे एक अर्थार्जनाचं साधन आहे.
जन्नत जुबैर या नव्या अर्थार्जनाच्या साधनाची सुपरस्टार आहे असं म्हटलं जातं.
इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपये मानधन घेते.
सीएनॉलेज पोर्टलनुसार ती महिन्याला 25 लाख रुपये कमावते.
जन्नत जुबैर रहमानी 21 व्या वर्षीच 25 कोटींची मालकीण आहे.