जपानी हे जगातील सर्वात जास्त काळ जगणारे लोक मानले जातात. ते त्ंयाच्या वयापेक्षा खूपच लहान दिसतात.
तारुण्य टिकवणं हे तुमचा आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.
जपानचे आयुर्मान सुमारे 84 वर्षे आहे जे भारतीयांपेक्षा सुमारे 14 वर्षे अधिक आहे.
जपानी आहारात सीफूड, सोया उत्पादने, आंबवलेले अन्न, भरपूर भाज्या, हर्बल चहा पितात.
हळुहळू चावत, आणि अन्नाचा आनंद घेत ते जेवतात. पचनासाठी हे आवश्यक असते.
जपानमध्ये लोक पोट भरेपर्यंत खातात. जास्त खाणे टाळण्यासाठी ते लहान प्लेट्स, वाट्या आणि चॉपस्टिक्स वापरतात
जपानी लोक कॉफीपेक्षा चहा जास्त पितात तोसुद्धा हर्बल टी,भरपूर अँटीऑक्सिडंट या चहात असतात.
जपानी ब्रेकफास्टमध्ये भात, सूप किंवा मासे, किंवा दलिया खातात.
जपानी लोकांना भात आवडतो मात्र, तो योग्य प्रमाणात खातात जेणेकरून चरबी वाढू नये.
वाफवून, आंबवून, उकळवून आणि तळून शिजवलेले खातात. कमीत कमी तेल वापरतात.