हाऊसफुल्ल शो अन् गोविंदांची सलामी, किंग खानच्या चाहत्यांचा ‘जवान’ उत्सव
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
शाहरुख खानच्या चाहत्यांनी ढोलताशांच्या गजरात या सिनेमाचं स्वागत केलं.
‘जवान’चे अनेक शो हाऊसफुल्ल आहेत. हा सिनेमा पैसा वसूल असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
दहीहंडीचे थर रचत गोविंदांनी सिनेमाला सलामी दिली आहे.
पहाटे पाच वाजल्यापासून हजारो चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली.चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम बघून शाहरुख खानही भारावला आहे.
त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, Love u boys and girls I hope u enjoy the entertainment. Kept awake to see u go to the theater. Big love and thanks.
'जवान' हा सिनेमा भारतातील 5500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर जगभरात हा सिनेमा 10000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 123 ते 150 कोटींची कमाई करू शकतो.
बॉलीवूडच्या बादशहाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार हे नक्की.