शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमा 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये क्रेझ आहे,फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
जोरदार ॲडव्हान्स बुकिंगनंतर थिएटरबाहेर काऊंटवर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली.
शाहरुख खानच्या फॅन क्लबवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पहाटे 2 वाजता चाहते थिएटरबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत.
फॅन पेजनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगावचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाहरुख खानची क्रेझ आजही कायम असल्याचं चित्र दिसत आहे.
लोकांचा उत्साह पाहून अनेक शहरांमध्ये जवानांचे मॉर्निंग शो आयोजित करण्यात आले आहेत.
किंग खानच्या जवान सिनेमाचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक एटली कुमार यांनी केले आहे.
शाहरुखसोबत नयनतारा, प्रियामणी, विजय सेतुपती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.