जय जवान गोविंदा पथकाने गाजवली संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी
मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
दहीहंडीसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी प्रसिद्ध आहे.
पाऊस आणि दहीहंडी उत्सव दोन्हीमध्ये सध्या ठाणेकर न्हाऊन निघाले आहेत.
भर पावसातही लोकांनी दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
गोविंदा पथकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
Fill in some text
वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला.
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी देत सगळ्यांची मनं जिंकून घेतली.