भारतात असं ठिकाणं आहे जिथे प्राण्यांना (बैल आणि गायींना) रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जाते.
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळते.
मात्र प्राण्यांना आठवड्यातून एकदा रविवारी सुट्टी दिल्याचं तुम्ही कधी बघितलं आहे का?
झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यामधील 20 हून अधिक गावांमध्ये गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. रविवारी बैल आणि गायींचा वापर केला जात नाही.
आठवड्यातून एक दिवस रविवारी प्राण्यांना सुट्टी दिली जाते. प्राण्यांचा आठ दिवसांचा थकवा निघून जावा, हा यामागचा उद्देश आहे.
लातेहारमधील काही गावांमध्ये जास्त काम करणाऱ्या जनावरांना दिलासा देण्याचा नियम करण्यात आला आहे.
माणसांचं जीवन जनावरांच्या श्रमानेच चालतं.त्यामुळे प्राण्यांना आराम दिला जातो.
पूर्वीच्या लोकांनी प्राण्यांच्या सुट्टीचे नियम केल्याचं लातेहारमधील लोक सांगतात.
प्राण्यांची काळजी घेणं हे माणसाचं काम आहे. हाच विचार करून इथे प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपरा सुरु करण्यात आली.
गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. कारण त्यावेळी एका बैलाचा जास्त कामामुळे मृत्यू झाल्याचं शेतकरी सांगतात.
त्यावेळी बसलेल्या पंचायतीने गुरे आणि गायींना एक दिवस सुट्टी द्यावी, असा निर्णय घेतला होता.आजही ही सुट्टीची परंपरा सुरु आहे हे विशेष.
Photo Credit - Social Media