Jiobook लॅपटॉप 31 जुलैला लॉन्च होणार आहे. याचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Jiobook लॅपटॉपचं हे अपडेटेड व्हर्जन असू शकतं.

गेल्या वर्षीच्या मॉडेलचं वजन 1.2 किलोग्रॅम होतं. नव्या लॅपटॉपचं वजन 990 ग्रॅम आहे.

याची किंमत 25 ते 30 हजारच्या दरम्यान असू शकते.

‘युअर अल्टिमेट लर्निंग पार्टनर’ या टॅगलाइनसह याची जाहिरात Amazon वर करण्यात आली आहे.

निळ्या रंगात हा लॅपटॉप उपलब्ध होणार आहे.

4G कनेक्टिव्हिटी आणि ऑक्टा कोर प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपद्वारे तुम्ही सगळी कामं करू शकता.

या लॅपटॉपसोबत जिओ कंपनी नवा डेटा प्लॅन लॉन्च करु शकते.

या लॅपटॉपला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.