दुर्गा पूजेसाठी काजोलचा लूक बघितला का ?

अभिनेत्री काजोल दरवर्षी दुर्गा पूजेमध्ये सहभागी होत असते.

यावर्षीदेखील तिने मुंबईत दुर्गापूजेला उपस्थिती लावली.

जुहू नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली होती.

देवीच्या दर्शनासाठी आलेल्या काजोलने यलो साडी नेसली होती.

 तिने साडीसोबत थोडे मोठे इअररिंग्स घातले होते आणि टिकली लावली होती.

हातात तिने मरुन कलरच्या बांगड्या घातल्या होत्या.

 तिने केस वर बांधून साधी हेअरस्टाईल केली होती.

 तिच्या या साध्या पण सुंदर लूकचं चाहते कौतुक करतायत.