Happy Birthday  Kamal Hassan - कमल हासन यांच्या नावावर आहेत ‘हे’ मोठे रेकॉर्ड

ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आज वाढदिवस आहे. ते 69 वर्षांचे झाले आहेत.

कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावावर असलेल्या रेकॉर्डविषयी जाणून घेऊयात.

कमल हासन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. त्यांना यासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. अशी संधी खूप कमी अभिनेत्यांना मिळाली आहे.  

कमल हासन हे एका चित्रपटासाठी 1 कोटीपेक्षा जास्त मानधन घेणारे पहिले अभिनेते आहेत. त्यांचं मानधन 1994 मध्ये 1.5 कोटीच्या आसपास होतं. 

कमल हासन यांना 19 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. कमल हासन हे एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांना 19 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. 

कमल हासन हे एकमेव असे भारतीय अभिनेते आहेत ज्यांचे 7 चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. 'सागर', 'स्वाति मुत्यम', 'नायकन', 'थेवर मागन', 'कुरुथीपुनाल', 'इंडियन' आणि 'हे राम' हे ते 7 चित्रपट आहेत.

कमल हासन चित्रपटातले स्टंट स्वतः करतात. स्टंट करताना त्यांची 34 हाडं तुटली आहेत. हा एक वेगळा रेकॉर्ड आहे. त्यांच्यानंतर जॅकी चॅनचा नंबर लागतो. स्टंट करताना त्याची 20 हाडं तुटली आहेत. 

कमल हासन यांच्या एका चाहत्याने त्यांचं धाग्यांपासून 7 फूट उंच असं पोट्रेट बनवलं होतं. या पोट्रेटमुळे कमल हासन आणि त्यांच्या फॅनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.