अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये पती आणि मुलांसोबत सुट्टी साजरी करत आहे.

करीना कपूर पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत लंच डेटवर असल्याचं दिसत आहे.

करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॅमिली व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. 

करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच त्यांनी ‘व्हेकेशन लंच’ असे कॅप्शनही लिहिले आहे.

 करीनाने लाल टॉपसह निळ्या रंगाचा स्ट्रीप शर्ट घातला आहे. तिने बेज रंगाची पँट आणि सनग्लासेससह तिचा लूक पूर्ण केला आहे.

निळा शर्ट आणि कॅपमध्ये सैफ अली खान खूपच मस्त दिसत आहे, तर तैमूर मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

करीना आणि सैफ सोनम कपूरच्या कुटुंबासोबतही लंडनमध्ये डिनर डेटवरही गेले होते. 

करीना कपूर, सैफ अली खानने ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केले. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना लवकरच 'द क्रू' या चित्रपटात दिसणार आहे.