कार्तिकी अमावस्येला या ठिकाणी लावा दिवा

Life style

20 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

आज  कार्तिकी अमावस्या आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

कार्तिकी अमावस्या 2025

कार्तिकी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करुन पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी दान करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

तर्पण आणि पिंडदान

दिवा लावणे

कार्तिकी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दिवा लावण्याचे नियम आहेत. कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा जाणून घ्या

पिंपळाच्या झाडाखाली

अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे करणे शुभ असते. यामुळे पितृदोष शांत होतो. पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो.

मुख्यप्रवेशद्वार

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला दिवा लावावा. त्यासोबतच देवी लक्ष्मी आणि विष्णूंचे स्मरण करावे. त्यामुळे धनलाभ होऊ शकतो.

देव्हारा

घरातील देव्हाऱ्यातील विष्णूंच्या जवळ दिवा अवश्य लावावा. यामध्ये तुळशीच्या कळ्या घालाव्यात, असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

शनि देवाजवळ

सूर्यास्तानंतर तिळाच्या तेलाचा दिवा शनि देवाच्या समोर लावावा. असे केल्याने शनि दोष समस्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.