कसबा-चिंचवड निकालाची उत्सुकता शिगेला

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे.

पुण्यात भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठसाठी मतदान झाले.

चिंचवडमध्ये भाजपा दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी पोटनिवडणुकीसाठी (२६ रविवारी, फेबुवारी) मतदान झाले.

पण त्यापूर्वीच एक्झिटपोलचा अंदाज समोर आला असून, कसब्यातून भाजपाला धक्का बसणार आहे

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय नक्की मानला जात आहे.

या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे.

याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.