कविता लाड-मेढेकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.

सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत.

कविता त्यांच्या कामाबरोबरच फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.

कविता यांनी त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट शेअर केलं आहे.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, मनोरंजनसृष्टीत काम करताना कसलीच वेळ निश्चित नसते पण स्वयंशिस्त असल्याने मी फिट आहे.

शांत झोप घेतली की दुसऱ्या दिवशी उत्साह टिकतो. रोज शांत झोप येण्यासाठी निष्ठेने काम केलं पाहिजे,असं कविता यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या की, स्वतःची योग्य काळजी घेतली तर ताण जाणवत नाही.

रोज स्वत:शी साधलेला संवाद सकारात्मक ऊर्जा देतो.

कविता लाड यांचं हे सिक्रेट सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे.