72 तास बर्फवृष्टी होऊनही अखेर केदारनाथ मंदिराची दारं दर्शनासाठी उघडण्यात आली. 

उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचं दार सकाळी 6.20 मिनिटांनी उघडण्यात आलं.

मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले. या सजावटीसाठी तब्बल दोन दिवस लागले.

72 तास बर्फवृष्टी होऊनही  अखेर केदारनाथ मंदिराचं दार उघडण्यात आलं.

सुमारे 8 हजारांहून अधिक भाविक केदारनाथचं दर्शन घेतील.

केदारनाथमध्ये सुमारे मायनस 6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 

केदारनाथमध्ये सलग बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी बर्फ साफ करण्यात आला. 

केदारनाथ धाम मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रशासनाने स्वच्छता केली.

 केदारनाथला जाण्याच्या मार्गावर अनेक ठिकाणी बर्फ साचलेला आहे.