तावडे भगिनींचं अनोखं रक्षाबंधन
Photo credit - khushbootawdeofficial and titeekshaatawde/instagram
रक्षाबंधन हा खरंतर भावाबहिणीचा सण. बहिण भावाला या दिवशी राखी बांधते.
मात्र खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे या बहिणींनी एकमेकींना राखी बांधून हा सण साजरा केला.
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे उमाच्या भूमिकेत आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितिक्षा तावडे नेत्राच्या भूमिकेत आहे.
दोघीही झी मराठी वाहिनीच्या मालिकांमध्ये काम करतायत.
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेच्या प्रमोशनसाठी दोघींनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातही हजेरी लावली होती.
तितिक्षा आणि खुशबूच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
सगळे जण तावडे भगिनींच्या या अनोख्या रक्षाबंधनाचं कौतुक करतायत.