Written By: Sayali Sasane
Source: Instagram
कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. तसेच अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिचा क्युट बेबी बंप चाहत्यांसह शेअर केला आहे.
कियारा अडवाणीने बेबी बंपसह मेट गालामध्ये पदार्पण केले. अभिनेत्री यामध्ये खूप सुंदर आणि आकर्षित दिसत होती.
कियाराने या मेट गालामध्ये भारतीय डिझायनर गौरव गुप्ता यांचा कस्टम कॉउचर आउटफिट निवडला. जो त्याच्यावर खूप आकर्षित दिसत होता.
कियाराने परिधान केलेल्या या सुंदर काळ्याड्रेसवर मागच्या बाजूला 'ब्रेव्हहार्ट्स' असे लिहिले होते. जे स्त्रीत्व, परिवर्तन आणि वंश यांचा संदेश देते.
कियाराच्या ड्रेसवर मदर हार्ट आणि बेबी हार्ट असं दोन्ही डिझायन दिसत आहेत ज्याला एक जोडलेली चेन होती जी तिच्या बेबी बंपला स्पर्श करत होती.
कियाराने या ड्रेसवर एकदम साधा आणि मोहक मेकअप परिधान केला आहे. ज्यामध्ये तिने न्यूट लिपस्टिक, चमकीरी आय शॅडो यांसह तिचा लुक परिधान केला होता.
कियाराने तिच्या या सुंदर ड्रेसवर गोल्डन आणि सिल्वर ॲक्सेसरीज घातल्या आहेत. तिच्या या लुकने चाहत्याचे लक्ष वेधले गेले आहे.