कढईचा वापर स्वयंपाकघरात नेहमीच केला जातो.
फ्लेममुळे कढई हळूहळू काळी पडू लागते ती वेळेवर साफ करणं गरजेचं असतं.
तुम्ही काही सोप्या साफसफाईच्या टिप्स फॉलो करून कढई चमकवू शकता.
कढई स्वच्छ करण्यासाठी त्यात 3 ग्लास पाणी ठेवून ते उकळवा
आता त्या पाण्यात बेकिंग सोडा, 2 चमचे डिटर्जंट पावडर टाकून 12-15 मिनिटं उकळू द्या.
कढईचे काळे डाग, चिकटपणा, घाण हळुहळू सुटायला लागेल.
लिंबू, बेकिंग सोडा टाकून त्याने कढई स्वच्छ घासल्यासही काळे डाग नाहीसे होतील.
सँड पेपर, स्क्रबरने बेकिंग सोडा, सर्फचा वापर करून स्वच्छ करू शकता.
या टिप्समुळे जुनी, आणि काळीकुट्ट कढई नव्यासारखी चमकेल.