स्वयंपाक घर नीट स्वच्छ ठेवायला हवं.
पावसाळ्यात विशेषत: जास्त स्वच्छ ठेवावं अन्यथा दुर्गंधी पसरते.
काही टिप्स वापरून तुमच्या स्वयंपाकघरात येणारी दुर्गंधी लगेच गायब होईल.
भाजी चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड ताबडतोब स्वच्छ करावा.
वेळोवेळी चॉपिंग बोर्डची साफ करावा, स्वच्छ धुवावा, म्हणजे दुर्गंधी येत नाही.
ओला आणि सुका कचरा एकत्र ठेवल्यास काही वेळातच दुर्गंधी येऊ लागते.
स्वयंपाकघरातील कचरा बाहेरच ठेवणे चांगले. तसेच तुमचे स्वयंपाकघर नेहमी कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
स्वयंपाकघरातील साफसफाईचं कापड रोजच्या रोज स्वच्छ करा.