सुक्या खोबऱ्याचा वापर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये केला जातो.
सुकं खोबरं वर्षभर कसं साठवून ठेवाल?
घरात साठवून ठेवलेलं खोबरं खवट आणि काळं पडतं.
त्यामुळे काळं पडलेलं आणि खवट खोबरं चवीला चांगलंही लागत नाही.
वर्षभर खोबरं कसं साठवायचं यासाठी काही टिप्स
एका पिशवीत खोबरं बांधून हवाबंद डब्यात ठेवा. पाणी लागू देऊ नका.
खोबरं आधी कागदावर पसरवा, एका वाटीत मिठाचं पाणी घ्या.
मिठाच्या पाण्यात एक कापड बुडवून खोबऱ्याची वाटी आतून-बाहेरून पुसून घ्या. मग खोबर सुकवा.
खोबऱ्याला आतल्या बाजूने खोबरेल तेल लावा.
तेल लावलेल्या खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात वाळवूनच हवा बंद डब्यात भरा.