आरोग्यासाठी वरदान आहे किवी, वाचा काय आहेत फायदे

 फळं खाणं हे शरीरासाठी चांगलं असतं.

त्यातही किवीसारखं फळ तर शरीरासाठी वरदान मानलं जातं.

 रोज किवी खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

किवीमुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो, असं तज्ञ सांगतात.तसेच रक्तदाबदेखील नियंत्रणात राहतो.

किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत असल्याने त्वचा स्वच्छ होते. यामुळे साखरेची पातळीदेखील नियंत्रणात राहते.

किवीमुळे पोटाचे त्रास कमी होतात. अल्सरही बरा होतो.

किवीमध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असल्याने हे फळ गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहे. 

किवीमुळे सांधेदुखी आणि मानसिक समस्या कमी होतात. किवीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.