www.navarashtra.com

Published Oct 29,  2024

By  Harshada Jadhav

भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल जाणून घेऊया

Pic Credit -  pinterest

'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 'जन गण मन' लिहीलं आहे.

राष्ट्रीय गीत

'वंदे मातरम' भारताचे राष्ट्रीय गीत असून ते बंकिम चंद्र चटर्जी यांनी लिहीलं आहे.

राष्ट्रगीत

भारताच्या राष्ट्रीयध्वजामध्ये केसरी, सफेद आणि हिरवा अशा तीन रंगांचा समावेश असतो. केसरी ताकत आणि शौर्याचं प्रतिक आहे. .

राष्ट्रध्वज

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना होते.

राष्ट्रीय प्राणी

मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. मोर आकर्षक रंगाचा सुंदर पक्षी आहे.

राष्ट्रीय पक्षी

कमळ भारत आणि व्हिएटनाम या देशांचे राष्ट्रीय फूल आहे. कमळाचे फूल शुद्धता, ज्ञान, शांतता, संतुलन याचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय फूल

आंब्याला महाराष्ट्रात 'कोकणचा राजा' म्हणतात. आंबा भारताचं राष्ट्रीय फळ आहे.

राष्ट्रीय फळ

भारताने वटवृक्षाला आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता दिली आहे. वटवृक्षाला धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे.

राष्ट्रीय वृक्ष

फील्ड हॉकी हा पारंपारिकपणे भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही.

राष्ट्रीय खेळ

हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी मानली जाते. 

राष्ट्रीय नदी

गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. गंगा नदीतील डॉल्फिनला 'गंगेचा वाघ' असेही म्हणतात.

राष्ट्रीय जलचर प्राणी