‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर एका म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे.
‘दादर अभिमान गीता’नंतर प्रणिल आर्ट्सचा दुसरा म्युझिक व्हिडिओ येत्या 20 ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
‘तूच मोरया’ असं या म्युझिक व्हिडिओचं नाव आहे.
नुकतंच याचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.
अंकिताचा हा पहिला म्युझिक व्हिडिओ आहे.
एका गरीब जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार कसा होतो हे या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे.
अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.
प्रणिल आर्ट्सचं हे दुसरं गाणं असून या गाण्याचं गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन प्रणिल हातिसकर यांनी केलं आहे.
अंकितासाठी ही एक मोठी संधी आहे.
Photo credit- Ankita walawalkar/ Instagram