‘या’ कोरियन ब्युटी टिप्स वापरल्याने उजळेल चेहऱ्याचं सौंदर्य
चेहरा सुंदर आणि ग्लोईंग दिसण्यासाठी काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
तुम्ही काही सोप्या कोरियन ब्युटी टिप्स वापरल्याने तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळू शकतं.
कोरियन स्किन केअरमध्ये, चेहरा एक्सफोलिएट करतात. एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रब.
चेहऱ्याला एक्सफोलिएट केल्याने त्वचेच्या मृत पेशी, घाण काढून टाकली जाते.स्क्रब चेहऱ्यावर 1 ते 1.5 मिनिटे चोळून मग चेहरा पाण्याने धुतात. त्यानंतर टोनर हलकेच चेहऱ्यावर लावा
आय क्रीम लावणं आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्याही दूर होतात.
यूवीए आणि यूवीबी किरणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सनस्क्रीन लावायला हवं.
कोरियन स्किन केअरमध्ये सनस्क्रीनचा वापर केला जातो.
तांदळाचं पाणी चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे लावता येईल. तांदूळ भिजत ठेवून त्याचे पाणी गाळून घ्या. हे पाणी फेस टोनर म्हणून लावू शकता.
या पाण्याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी करता येईल किंवा सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुण्यासाठी तांदळाचे पाणी देखील वापरू शकता.