कृति सेननचं साधेपणातलं सौंदर्य

Photo Credit- kritisanon/instagram

अभिनेत्री कृति सेननला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.

 कृतिने या पुरस्कार सोहळ्यातले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या साधेपणातल्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत

 अल्लू अर्जन आणि आलिया भट्ट यांनाही राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला. त्यांच्यासोबतचा फोटोही कृतिने शेअर केला आहे.

आलिया आणि कृतिच्या चेहऱ्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद झळकत होता.

कृतिने अल्लू अर्जुनसोबत पुष्पा चित्रपटातली पोज देत फोटो काढला.

‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणारे पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही कृतिने फोटो काढला.

 पुरस्कार सोहळ्यासाठी कृतिसोबत तिचे आई-बाबादेखील आले होते.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा क्षण हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याचं कृतिनं म्हटलं आहे.