सध्या गाजत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात क्षिती जोग ही मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे.
क्षिती जोगच्या या चित्रपटातील भूमिकेचं सध्या खूप कौतुक होतंय.
क्षिती जोग म्हणते, यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केलं आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव विलक्षण आहे.
ती पुढे सांगते की, या चित्रपटातल्या माझ्या व्यक्तिरेखेची दखल घेतली जातेय, हे माझ्यासाठी खूप सुखावणारं आहे.
या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाल्याचं क्षिती म्हणाली.
चित्रपटात
क्षिती
जोगने रणवीर सिंगच्या आईची भूमिका केली आहे.
तिला गायिका बनायचं असतं, पण लग्नानंतर काही कारणांमुळे हे स्वप्न मारलं जातं.
दिग्दर्शक करण जोहरनेही क्षिती जोगचं कौतुक केलंय.
करण म्हणाली की, क्षिती एक गुणी आणि प्रामाणिक अभिनेत्री आहे. व्यक्तिरेखेसाठी
ती
खूप मेहनत घेते. ती कोणतीही भूमिका चांगली करू शकते.