म्हणून माझ्यावर महेश मांजरेकरांनी चित्रपट काढला नाही - राज ठाकरे

मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध मराठी टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

अवधूत गुप्तेच्या आगामी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत.

या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना ट्रोलर्सने विचारलेले काही प्रश्न दाखवले.

त्यावेळी राज ठाकरेंना तुमच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी त्यावर फारच हटके पद्धतीने उत्तर दिले.

a

राज साहेब तुमच्या पक्षात महेश मांजरेकर, अमेय खोपकर, अभिजीत पानसे असे सिनेमे बनवणारे लोक पक्षात आहेत. पण एकालाही तुमच्यावर सिनेमा का काढावासा वाटला नाही? असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर राज ठाकरेंनी माझ्यात तसं मटेरिअल नसेल, असे मजेशीर उत्तर दिले. त्यावर अवधूत गुप्तेने साहेब तुमचं आयुष्य आपकी जिंदगी इतनी लंबी नही इतकी बडी भी है, तुम्ही वेबसीरिजच सुरु करा. त्याचे अनेक सिझन होतील असे म्हटले.

येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.