लाभ पंचमी कधी आहे, जाणून घ्या

Life style

26 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

दरवर्षी कार्तिक शुक्ल पंचमी तिथीला लाभ पंचमी साजरी केली जाते. यावेळी रविवार, 26 ऑक्टोबर रोजी लाभ पंचमी आहे.

लाभ पंचमी 2025

हा दिवस धार्मिकदृष्ट्या खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. लाभ पंचमीला कशाची खरेदी करावी, जाणून घ्या

काय खरेदी करावे

चांदीचा कासव

धार्मिक मान्यतेनुसार, लाभ पंचमीच्या दिवशी चांदी किंवा पितळेचा कासवाची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते

चांदीचा कासवाचे फायदे

असे मानले जाते की, लाभ पंचमीच्या दिवशी चांदीच्या कासवाची खरेदी केल्याने घरामध्ये नेहमी संपत्ती आणि सौभाग्यात वाढ होते.

कासव कुठे ठेवावा

लाभ पंचमीला चांदीचा कासव खरेदी करुन घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने आर्थिक समृद्धी कायम राहते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. 

गोमती चक्र

याशिवाय लाभ पंचमीला गोमती चक्र खरेदी करणे शुभ मानले जाते. गोमती चक्र खरेदी केल्याने संपत्ती, समृद्धी येते आणि यश मिळते.

खातेवहीची खरेदी

लाभपंचमीच्या दिवशी शुभ आणि लाभ लिहिलेले खातेवही उघडणे शुभ असते.