लतादिदींना का आवडायच्या पांढऱ्या रंगाच्या साड्या ?
जगभरात प्रसिद्ध असलेल्या गायिका लता मंगेशकर यांची आज जयंती.
इंदोरमधल्या शिख गल्लीमधील एका चाळीमध्ये 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला.
लतादिदींना पांढऱ्या रंगाच्या साड्या खूप आवडायच्या.
त्यांना पांढरा रंग का आवडायचा याचं कारण एकदा त्यांनी सांगितलं होतं.
लतादिदी म्हणाल्या होत्या की, लहान असताना मी पांढऱ्या रंगाचेच परकर पोलकं घालायचे. इतर रंगांपेक्षा या रंगात मी जास्त रमायचे.
रंगीत साडी नेसल्यावर नेमकी काहीतरी न आवडणारी घटना घडायची. गडद रंग अंगावर असले की ते माझ्यावर उधळल्यासारखे दिसायचे, असं त्या म्हणाल्या होत्या.
मी रंगीत साड्या नेसायचे पण दररोज वेगळा रंग आवडायचा. पण पांढरा रंग कायम जवळचा वाटायचा, असं त्यांनी सांगितलं होतं.
तेव्हापासून लतादिदींनी पांढऱ्या रंगाची साडी नेसायचं ठरवलं. शेवटपर्यंत त्या वेगवेगळ्या रंगाची बॉर्डर असलेल्या पण पांढऱ्याच साड्या नेसत होत्या.