सुरेखा पुणेकरांनी आपल्या अदांनी आजवर प्रेक्षकांना घायाळ केलेलं आहे.
लावणीसम्राज्ञा सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत BRS पक्षात प्रवेश केला आहे.
हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात प्रवेश केला आहे.
2021 मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
तमाशा ते लावणी, टीव्ही शो, सिनेमा असा मेहनतीचा आणि जिद्दीचा प्रवास त्यांनी केला.
मराठी बिग बॉस या रिएलिटी शोमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.
सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या आठव्या वर्षीपासूनच नृत्याला सुरुवात केली.
राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडत आता त्यांनी BRS पक्षात प्रवेश केला आहे.