स्लिम ट्रिम असावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो.
स्लिम कंबरेसाठी हा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. फक्त 5 मिनिटे हा व्यायाम करायचा आहे.
Plank exercise केल्याने पोटाची चरबी कमी होते, शरीर टोन होते, कंबर स्लिम होते.
त्यासाठी पोटावर झोपा, नंतर तळवे आणि बोटांवर दाब देऊन शरीर वर उचला , शरीर सरळ ठेवा.
यामध्ये शरीर सरळ रेषेत ठेवणं, शक्य तितक्या लांब स्थितीत ठेवणं महत्त्वाचं आहे.
plank exercise केल्याने स्नायू मजबूत होतात. शरीराचा समतोल राखला जातो.
पाठीच्या दुखापतीचा धोका plank केल्याने कमी होतो.
बॉडी पॉश्चर सुधारण्यासाठी plank exercise खूप फायदेशीर ठरते.