पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
त्याआधी राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना दही-साखर खाऊ घातली.
हिंदू धर्मात कोणत्याही मंगल कार्याआधी दही-साखर खाणं शुभ मानलं जातं.
दही-साखरेमुळे इच्छित कार्य पूर्ण होते असे मानले जाते.
पांढऱ्या गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत, चंद्र हा मनाचा कारक आहे.
या दोन्ही गोष्टी पांढऱ्या रंगाच्या, त्यामुळे दही आणि साखर खाल्ल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते.
कामात यश मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते.
शुभ कार्यापूर्वी दही-साखर खाल्ल्याने जीवनात सुख-शांती राहते.