सध्या घरांमध्ये विद्युत उपकरणांची संख्या वाढत आहे.
खोलीतून बाहेर पडल्यानंतर पंखे आणि दिवे बंद करायला विसरतो.
फ्रीज रोज सुरू असतो. मात्र, भिंतीजवळ ठेवल्याने त्याच्या कंप्रेसरवरील भार वाढतो.
एसीचं तापमान कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्या.
एसी चालवा पण खोली थंड होताच तो बंद करा.
एसीचं नियमित सर्व्हिसिंग न केल्यास तो व्यवस्थित थंड होत नाही आणि त्यामुळे जास्त वेळ चालवावा लागतो.
टीव्ही पाहिल्यानंतर तो नुसता रिमोटने बंद करतात, स्वीच सुरूच राहतो, त्यामुळे वीजपुरवठा सुरूच राहतो.
इंडीकेटरमुळेही वीजबील वाढते. कारण, वीजअसेपर्यंत इंडीकेटर वीज वापरतो.