अंड्यामधील व्हिटॅमिन ए, बायोटिन, प्रोटीन असते. त्यामुळे केस निरोगी राहतात.

केसांना लवाण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. अंड्याची अ‍ॅलर्जी नाही ना तपासून घ्या.

एका बाउलमध्ये दोन अंडी फोडा, एकत्र करा, केसांच्या मुळांना आणि टाळूला लावा.

कोंडा असल्यास अंड्यात मध, ऑलिव्ह ऑईल, दही घाला.

थेट अंडी वापरण्याऐवजी तुम्ही अंडी असलेले शाम्पू, कंडिशनर लावू शकता.

अंड्याचं मिश्रण केसांवर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवणं जास्त परिणामकारक.

केस तेलकट असल्यास आधी धुवून मग हा हेअर मास्क तुम्ही लावू शकता.

हेअर मास्क लावल्यानंतर सौम्य शाम्पू वापरावा.

शाम्पू केल्यानंतर कोणताही कंडीशनर केसांना लावू नका.