उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि या घामाची दुर्गंधीही येते.
घामाच्या या दुर्गंधीमुळे कोणाला भेटतानाही लाज वाटू शकते.
पर्फ्यूम, किंवा आंघोळीनंतरही घामाची दुर्गंधी जात नाही.
उन्हाळ्यात सुती कपडे म्हणजेच कॉटनचे कपडे वापरा. आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाका.
आंघोळीच्या आधी अंडरआर्म्सला लिंबाचा रस लावा आणि काही वेळानंतर आंघोळ करा.
दिवसातून 3 ते 4 वेळा आंघोळ करा, घामाची समस्या कमी होईल.
कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापासून स्वतःचे संरक्षण देखील केले पाहिजे.
शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेही घामाचा त्रास होऊ शकतो.