काही दिवसांनंतर मोजे फाटायला लागतात, जुने होतात मग ते आपण फेकून देतो.

मात्र, असे फाटलेले, जुने झालेले मोजे फेकून देण्यापेक्षा त्याचा घरच्यासाठी उपयोग करा.

फाटलेले मोजे फेकून देण्याऐवजी ते घरकामासाठी कसे वापरू शकता ते पाहा.

काचेच्या खिडक्या आणि आरसे स्वच्छ करण्यासाठी मोजे उत्तम.

घराच्या भिंती, खिडक्या साफ करण्यासाठी हे मोजे तुम्ही वापरू शकता.

कारवरची धूळ आणि सफाईसाठीही हे जुने मोजे वापरू शकता.

तेलाच्या बॉटलचे डाग लागू नयेत म्हणून हे मोजे कापून त्यांचं कव्हर बनवू शकता.

जुन्या आणि फाटलेल्या सॉक्समध्ये क्लिप्स वापरून लहान मुलांसाठी खेळणी बनवू शकता.