उन्हाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांमुळे त्रास होतो.
गळणारे केस कोरडे झाले की ते सहज तुटू लागतात.
उन्हामुळे तुमचे केसही कोरडे झाले असतील तर हे घरगुती उपाय करा.
काकडी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि केसांना मुलायम बनवते.
काकडी मिक्सरमध्ये बारीक करा किंवा किसून घ्या. त्याचा रस काढून एका भांड्यात ठेवा. हा रस केसांना आणि मुळांना लावा.
काकडीचा हेअर मास्क लावल्यानंतर दोन तासांनी केस पाण्याने धुवा. नंतर शॅम्पू करा. यामुळे केस मऊ होतील.
दुधाची साय केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.
सायीमध्ये गुलाबपाणी मिक्स करा, हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास लावून ठेवा.
त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा, नंतर सौम्य शाम्पूने हेअर वॉश करा.