झोपताना म्युझिक अर्थातच संगीत ऐकल्याने अनेक फायदे होतात.

यामुळे शरीराला आराम मिळतो आणि तणावापासून शांतता मिळते.

बरेच लोक झोपण्यापूर्वी संगीत ऐकतात आणि ऐकत असताना झोपी जातात.

बऱ्याच वेळा मनात अनेक गोष्टी चालू असतात, संगीत ऐकल्याने मन शांत होते आणि चांगली झोप लागते.

संगीत ऐकल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि माणसाची सर्जनशीलता वाढते.

रात्री झोपण्यापूर्वी हलके संगीत ऐकल्याने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.

संगीत ऐकल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीराच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

रात्री झोपण्यापूर्वी खूप मोठ्या आवाजात आणि फास्ट म्युझिक ऐकून नये.