लिचीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे अनेक गुणधर्म आढळतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी, कोरफड जेल आणि गुलाबपाणीमध्ये लिचीच्या सालीची पावडर मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.
टॅनिंग दूर करण्यासाठीही लिचीच्या सालीची पावडर, बेकिंग सोडा, लिंबाचा रस घाला.
भेगा आणि कोरड्या टाचांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, लिचीच्या सालीची पावडर, सोडा, मुलतानी माती आणि सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये मिसळा आणि टाचांवर लावा आणि कोरड्या झाल्यानंतर धुवा.
लिचीच्या सालीची पावडर,हळद, आणि दूधाच्या पेस्टने स्क्रब बनवा आणि शरीराला लावा..
मानेवर स्क्रब म्हणून लिचीची साल वापरू शकता. मानेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास आणि मान स्वच्छ करण्यास मदत करते.
अशाप्रकारे लिचीचं साल स्किन केअर म्हणून वापरू शकता.